पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
पोटॅश प्राईम हे लाल समुद्री शेवाळापासून (Red Seaweed)तयार केलेले प्रगत सेंद्रिय पोटॅश आहे. यामध्ये सहज उपलब्ध होणारे पोटॅश तसेच नैसर्गिक सागरी जैवघटक असल्यामुळे पिकाला पोषकद्रव्यांचा प्रभावी वापर करण्यास मदत होते. त्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते, उत्पादनात वाढ होते आणि दर्जेदार उत्पन्न मिळण्यास मदत होते.
फायदे
१ पिकाला पोटॅशचे प्रभावी शोषण होऊन पोषकद्रव्यांचा अधिक चांगला वापर होण्यास मदत करते.
२ अन्ननिर्मितीची (प्रकाशसंश्लेषण) प्रक्रिया सुधारून पिकाची जोमदार वाढ करते.
३ फुलधारणा, फळधारणा आणि दाणे भरण्यास मदत करून उत्पादन क्षमता वाढवते.
४ फळांचा आकार, रंग, कडकपणा, गुणवत्ता आणि साठवण क्षमता सुधारते.
५ पिकातील पाण्याचा समतोल राखून पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यास मदत करते.
६ उष्णता, दुष्काळ, क्षारयुक्त जमीन व इतर प्रतिकूल परिस्थितीचा ताण सहन करण्याची क्षमता वाढवते.
७ लाल समुद्री शेवाळातील नैसर्गिक जैवघटक पिकाची वाढ आणि चयापचय क्रिया सक्रिय करतात.
८ नैसर्गिक पॉलीसॅकाराइड्स, अमिनो आम्ले व सागरी जैवउत्तेजकांमुळे पोषकद्रव्यांचा अधिक कार्यक्षम वापर होतो.
९ सेंद्रिय सागरी स्त्रोतांपासून तयार असल्याने पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी उपयुक्त आहे.
१ ० पिकाची वाढ, उत्पादन आणि दर्जा सुधारण्यास मदत करते.
वापरण्याची पद्धत
फवारणी आणि,
ठिबक सिंचन / फेर्टीगेशन
मिसळण्यास सुसंगत
पोटॅश प्राइम हे सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या बहुतांश खते, सूक्ष्मपोषक द्रव्ये आणि पीक संरक्षण उत्पादनांशी सुसंगत आहे. मोठ्या प्रमाणावर मिश्रण करण्यापूर्वी जार सुसंगतता चाचणी करण्याची शिफारस केली जाते. तीव्र अल्कधर्मी उत्पादनांसोबत मिसळणे टाळा.
प्रमाण
१- फवारणी: १०० ग्रॅम प्रति एकर.
२- सर्वोत्तम परिणामांसाठी, पिकाच्या सक्रिय वाढीच्या, फुलोऱ्याच्या, फळ विकासाच्या टप्प्यांमध्ये, किंवा पोटॅशियमची जास्त गरज आणि अजैविक ताणाच्या काळात फवारणी करावी.
पिकांसाठी लागू
सर्व शेती पिके, फळबाग पिके, मळ्यातील पिके, भाजीपाला, फळे, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मसाले, फुलशेती आणि संरक्षित लागवडीच्या पिकांसाठी उपयुक्त.