किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
लागू पिके
गहू,सोयाबीन, कापूस, तूर, भात
अतिरिक्त वर्णन
स्टॉम्प (पेंडिमेथालिन 30% EC) पेंडीमेथालिन हे डायनिट्रोएनिलिन वर्गाचे एक तणनाशक आहे ज्याचा उपयोग वार्षिक गवत आणि काही विस्तृत पानांच्या उगवणीपूर्वी आणि उगवणीनंतर तणांच्या नियंत्रणासाठी केला जातो.
विशेष टिप्पणी
१- तणनाशकाचे लेबल काळजीपूर्वक वाचा आणि लेबलच्या माहितीनुसार अनुसरण करा.
२. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीसाठी फ्लॅट फॅन किंवा कट नोझल वापरावे.
३. कोणत्याही तणनाशकाच्या फवारणीपूर्वी आणि फवारणीनंतर पंप स्वच्छ पाण्याने चांगला धुवून घ्यावा.
४. शिफारशीनुसार योग्य प्रमाणात तणनाशकाचा वापर करावा. जास्त वापर केल्यास पिकास हानी पोहचण्याची शक्यता असते तर कमी वापरल्यास तणांवर औषधाचा चांगला परिणाम झालेला दिसत नाही.
५. तणनाशक प्रथम कमी पाण्यात (१-२ लिटर) मिसळून घ्यावे त्यानंतर आवश्यक (१२०-२०० लिटर) पाण्यामध्ये हे मिश्रण मिसळून फवारणी करावी.
६. तणनाशकाच्या फवारणीसाठी प्रति एकर क्षेत्रासाठी किमान १२० लिटर पाण्याचा वापर करावा.
७. वादळी व पावसाच्या दिवसात तणनाशकांची फवारणी करु नका.
८. उगवणीनंतर फवारणी करतेवेळी पिकाची आणि तणांची अवस्था पाहून घ्यावी.
९. लेबलयुक्त कंटेनरमध्ये तणनाशक ठेवावे तसेच हे अन्नपदार्थ व मुलांपासून दूर ठेवावे.
१०. लक्षात ठेवा, कोणत्याही तणनाशकाची फवारणी करतेवेळी जमिनीत पुरेसा वाफसा असणे आवश्यक आहे.
पिकाची अवस्था
पिकाची पेरणी केल्यानंतर आणि सिंचन करण्यापूर्वी फवारणी करावी
महत्वपूर्ण माहिती
फवारणी उलट चालून करावी आणि फवारणी केलेल्या शेतात चालणे टाळावे