लष्करी अळी सुरुवातीच्या अवस्थेत आपली उपजीविका कोवळ्या पानांवर करतात. नंतर पोंग्यात छिद्र पडून आत शिरून आतील भागावर उपजीविका करतात.दुसऱ्या व तिसऱ्या अवस्थेत अळी काहीवेळा पानांच्या कडापासून आतल्या भागापर्यंत खातात. नंतरच्या अवस्था या प्रामुख्याने पीकवाढीचा भाग खातात, ज्यामुळे तुरा बाहेर येत नाही. कोवळी कणसे खातात.