पिठ्या ढेकणाची अळी आणि प्रौढ ढेकूण खोड;कळ्या;फुलातील पराग;हवेतील मुळे; पाने;शेंडे;गाठी;फुलांच्या मंजिऱ्या;आणि फांद्या मधून अन्नरस शोषतात. वाढणाऱ्या भागावर प्रादुर्भाव दिसू लागताच विशेषतः गुलाबी पिठ्या ढेकूणामुळे पानांमध्ये आणि शेंड्याच्या टोकावर विकृती दिसते. पिठ्या ढेकणाची अळी आणि प्रौढ ढेकणाने बाहेर टाकलेला गोड स्राव पानांवर;शेंडे आणि शाखांवर काळी बुरशी वाढण्यास मदत करतो.