खुरटे रोप आणि मुळांवर गाठी
सूत्रकृमी - सूत्रकृमी मुळातील अन्नरस शोषून घेतात. अन्नरस शोषताना मुळांमध्ये पाचक रस सोडतात व मुळांवर गाठी तयार झाल्याचे दिसून येते त्यामुळे पिकाची वाढ खुंटते, पाने पिवळी पडतात आणि अकाली फळगळ होते. सूत्रकृमींच्या प्रादुर्भावामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होऊन झाड वाळते.