
दुय्यम लक्षणे- सुरूवातीला पानांच्या कडांभोवती छोटे पिवळसर ठिपके येतात. हळूहळू ते मोठे होतात आणि नंतर त्यांचे समकेंद्री वर्तुळे असलेल्या तपकिरी चट्टयांमध्ये रूपांतर होते. गंभीर प्रादुर्भाव झाल्यास पुढे पाने वाळतात आणि गळतात. प्रादुर्भावग्रस्त फळांवर गडद तपकिरी-जांभळट भाग दिसू लागतात.