सुरुवातीला पानांवर तसेच शिरेस समांतर लहान पिवळसर लांबट गोल ठिपके पडतात. हे ठिपके कालांतराने वाढत जाऊन वाळतात. त्यांचा रंग तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी होतो. या ठिपक्यांभोवती पिवळ्या रंगाची वलये निर्माण होतात. हे ठिपके साधारणतः १ ते २ मिमी आकाराचे असतात.