सुरुवातीच्या अवस्थेत, लागण झालेल्या फळांवर छोटे काळे ठिपके तयार होतात. हळूहळू हे डाग आकारात वाढतात आणि तपकिरी होतात, फळांची त्वचा काळी होते आणि या डागांवर गुलाबी पावडर दिसते. शेवटी संपूर्ण फळावर परिणाम होतो. नंतर कीड पसरते आणि संपूर्ण घडावर परिणाम करते.