AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हीरोची स्प्लेंडर प्लस आली नव्या अवतारात ! जाणून घ्या फीचर्स !
ऑटोमोबाईलAgrostar
हीरोची स्प्लेंडर प्लस आली नव्या अवतारात ! जाणून घ्या फीचर्स !
🏍️हीरो मोटोकॉर्पने स्प्लेंडर प्लस चा नवीन रंग पर्यायायांसह सादर केली आहे. ही मोटारसायकल आता नवीन सिल्व्हर नेक्सस ब्लू कलर पर्यायासह देखील देण्यात येईल. याशिवाय स्प्लेंडर ब्लॅक विथ पर्पल, हेवी ग्रे विथ ग्रीन, ब्लॅक विथ सिल्व्हर, मॅट शील्ड गोल्ड आणि ब्लॅक विथ स्पोर्ट्स रेड या रंगाच्या पर्यायांमध्ये आधीपासूनच उपलब्ध आहे. स्प्लेंडर प्लस किंमत 70,658 रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. 🏍️एंट्री-लेव्हल कम्युटर मोटरसायकल 97.2cc एअर-कूल्ड सिंगल-सिलेंडर इंधन-इंजेक्टेड इंजिनसह देण्यात येते. जी 7.9 bhp @ 8,000 rpm आणि 8.05 Nm @ 6,000 rpm टॉर्क जनरेट करते. इंजिन चार-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. बाइकला स्टार्ट/स्टॉप सिस्टीम, इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टीम आणि ड्रम ब्रेक देखील मिळतात. 🏍️पुढील महिन्यात येणार पहिले इलेक्ट्रिक मॉडेल L: हीरो मोटोकॉर्प कंपनी पुढील महिन्यात भारतात आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्याच्या लॉन्चसह, कंपनी इलेक्ट्रिक वाहन बाजारात देखील दमदार प्रवेश करेल.हिरो मोटोकॉर्प ने यावर्षी मार्चमध्ये सांगितले होते की त्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांसह पर्यावरण, सामाजिक आणि ऑपरेशन सोल्यूशनवर $100 दशलक्ष (सुमारे 760 कोटी) ची गुंतवणूक उभी केली आहे.हिरो मोटोकॉर्पआपल्या विडा ब्रँड अंतर्गत पुढे येत असलेले नवीन ट्रांनपोर्ट ऑप्शन्स सादर करण्याची योजना आखत आहे. 🏍️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
53
5