AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळदीची काढणीपश्चात प्रक्रिया
गुरु ज्ञानAgrostar India
हळदीची काढणीपश्चात प्रक्रिया
👉🏼हळद पिकाची काढणी केल्यांनतर त्यावर प्रक्रिया करणे खूप गरजेचे असते. प्रक्रियेमध्ये हळद शिजवणे, वाळवणे, पॉलीश करणे आणि प्रतवारी करणे इत्यादी गोष्टी समाविष्ट असतात. हळदीची काढणी झाल्यानंतर सावलीत किंवा पाल्याखाली त्याची साठवणूक करावी. त्यांनतर 4 ते 5 दिवसांनी लगेच हळद शिजवून घ्यावी. हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करावी. कारण, सर्व हळकुंडांचा आकार एकसारखा नसतो, जाडी कमी अधिक असते. त्यामुळे जाड हळकुंडांना शिजण्यास जास्त वेळ तर लहान हळकुंडांना कमी वेळ लागतो. त्यामुळे हळद शिजवण्यापूर्वी हळकुंडांची प्रतवारी करून घ्यावी. 👉🏼हळद शिजविण्याच्या पद्धती 1) काहिलीत हळद शिजवणे - या पद्धतीमध्ये गूळ तयार करण्याच्या उथळ कढईचा (काहिलीचा) वापर होतो. कढईत हळदीचे कंद भरल्यानंतर पाला, गोणपाट किंवा माती थर टाकून वरचे तोंड बंद केले जाते. कढईच्या मध्यभागी कंद ठेवले जातात. काहिलीमध्ये पाणी भरून त्याला 2.5 ते 3 तास शिजवले जाते. पण या पध्दतीमध्ये वेळ, इंधन आणि मजूर जास्त खर्ची पडतात. तसेच हळद एकसमान शिजत नाही त्यामुळे हळदीचा दर्जा खालावतो आणि कुरकुमीनचे प्रमाण कमी होते. 2)बॉयलर किंवा वाफेच्या सयंत्राचा वापर - यामध्ये 250 किलो हळद सामावली जाईल एवढ्या क्षमतेचे चार लोखंडी ड्रम असतात. सयंत्राच्या मध्यभागी पाण्यासाठी दोन टाक्या असतात. पाणी उकळण्यास दीड तासाचा अवधी पुरेसा होतो. पाणी उकळल्यानंतर तयार झालेली वाफ पाइपद्वारे लोखंडी ड्रममध्ये सोडली जाते. योग्य पद्धतीने हळद शिजवल्यानंतर लोखंडी ड्रमच्या खालील बाजूने असलेल्या नळातून पाणी टिपकण्यास सुरुवात होते.पाणी येऊ लागताच हळद शिजली असे समजले जाते. या पद्धतीमध्ये वेळ आणि इंधन कमी लागते. ड्रममधील हळद योग्यरीत्या शिजली जाते. तसेच हळदीचा योग्य दर्जा राखला जातो आणि कुरकुमीनचे प्रमाण आहे तसे साठविले जाते. 👉🏼हळद वाळविणे - शिजवलेली हळद कठीण जागी वाळत घालावी. लोखंडी ड्रममधून शिजवलेली हळद 20 ते 30 मिनिटांसाठी पसरविण्याच्या ठिकाणी ढीग करून ठेवावी. त्यानंतर हळद पसरावी. शिजवून घेतलेली हळद 12 ते 15 दिवस उन्हामध्ये चांगली वाळवून घ्यावी. वाळवलेल्या हळकुंडामध्ये आर्द्रतेचे प्रमाण 11 ते 12 टक्के एवढे असावे. 👉🏼हळद पॉलीश करणे – हळदीला चांगली चकाकी येऊन बाजारामध्ये चांगला दर भेटण्यासाठी पॉलिश करणे खूप महत्वाचे आहे. हळद पॉलीश करण्यासाठी लोखंडी ऑईलच्या बॅरलचा वापर केला जातो. बाजारामध्ये इलेक्ट्रीक मोटारीवर चालणारे हळद पॉलीश ड्रम देखील उपलब्ध आहेत. वाळलेल्या हळदीचे उत्पादन ओल्या हळदीच्या 20 ते 25 टक्के इतके मिळते. 👉🏼पॉलीश केल्यानंतर हळकुंडाची किमान 4 प्रकारांमध्ये प्रतवारी करावी. - जाड, लांब हळकुंडे (3 ते 5 सेंमी लांबी) - मध्यम जाड हळकुंडे (2 ते 3 से.मी. लांबी) - लहान आकाराची हळकुंडे (2 से.मी. पेक्षा कमी लांबी) - लहान माती व खडे विरहित कणी. हळदीमध्ये मालाचा दर्जा, जाडी, लांबी, चकाकी, आकर्षकपणा या बाबी विक्री करताना बघितल्या जातात. यासाठी प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे." 👉🏼संदर्भ:-Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
0
इतर लेख