AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद, आले पिकाच्या लागवडीचे अंतर आणि सुरुवातीचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद, आले पिकाच्या लागवडीचे अंतर आणि सुरुवातीचे अन्नद्रव्ये व्यवस्थापन!
➡️ हळद व आले पिकाची लागवड हि बेड तयार करून योग्य अंतरावर करावी. ठिबक लागवडीसाठी 1 मीटर रुंदीचा, 20 ते 25 सेंटी मीटर उंच गादीवाफा तयार करून त्यामध्ये खतांचा बेसल डोस भरावा आणि त्यावर 30*30 सेंटी मीटर अंतरावर कंदांची लागवड करावी. सुरुवातीला बेड तयार करताना त्यामध्ये मुबलक शेणखत, युरिया @50 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट @200 किलो, म्युरेट ऑफ पोटॅश @75 किलो, सुक्ष्म अन्नद्रव्ये @10 किलो, निंबोळी पेंड @100 किलो, सल्फर @5 किलो, फ्युराडॉन @7 किलो प्रति एकर हि खतांची मात्रा द्यावी जेणेकरून सुरुवातीच्या अवस्थेत आले पिकाची जोमदार वाढ होईल सोबतच निंबोळी पेंड आणि फ्युरॉडॉन चा वापर केल्यामुळे कीड नियंत्रणास मदत होईल. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
5
इतर लेख