AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हळद आणि आद्रक पिकातील पिवळेपणा नियंत्रण !
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हळद आणि आद्रक पिकातील पिवळेपणा नियंत्रण !
🌱हळद आणि आद्रक पिकामध्ये पिवळेपणाची समस्या दिसून येत असेल. त्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आणि अन्नद्रव्य कमतरता अशा विविध कारणांमुळे हळद आणि आद्रक पिकामध्ये पिवळेपणाची समस्या बघायला भेटते. पाने भुरकट पिवळसर रंगाची होतात. त्यामुळे त्याचा परिणाम अन्ननिर्मितीवर होऊन पिकाच्या उत्पादनावरती होतो. हि पिके मसालावर्गीय तसेच एकदल वर्गातील असल्यामुळे कीड - रोग नियंत्रणासोबतच गन्धक आणि फेरस या अन्नद्रव्याची पूर्तता करणे गरजेचे आहे. 🌱ठिबकची सुविधा असल्यास फेरस @500 ग्रॅम प्रति एकर व 90 % गंधक @3 किलो प्रति एकर वेगवेगळ्या वेळी सोडावे. ठिबकची सुविधा नसल्यास चिलेटेड फेरस @1 ग्रॅम प्रति लिटर फवारणी करावी आणि सल्फर 65 % + झिंक 18 % घटक असणारे सेलझीक @ 3 ते 6 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे. 🌱संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
5
इतर लेख