AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हरभरा पिकातील तण नियंत्रण
गुरु ज्ञानAgroStar
हरभरा पिकातील तण नियंत्रण
👉हरभरा पिकांमध्ये तणांचा अप्रत्यक्ष परिणाम पिकाच्या वाढीवर होतो, ज्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. तण पिकाच्या पोषणासाठी स्पर्धा करतात, ज्यामुळे पिकाला आवश्यक पोषकद्रव्ये कमी मिळतात. त्यामुळे तणनियंत्रण वेळेत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 👉हरभरा पिकात तण उगवण्यापूर्वीच फवारणी करणे योग्य असते. पेरणीनंतर 48 तासांच्या आत पेंडीमिथॅलीन 30% इसी घटक असलेले परपेंडी तणनाशक 1 लिटर प्रति एकर 150 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीच्या वेळी जमिनीच्या पृष्ठभागात ओल असल्यास तणनियंत्रण अधिक प्रभावी ठरते. 👉फवारणी झाल्यानंतर 30 ते 35 दिवसांमध्ये खुरपणी किंवा कोळपणी करणे आवश्यक आहे. यामुळे तणनियंत्रण चांगले होते, तसेच जमीन भुसभुशीत राहते आणि हवा खेळती राहते. परिणामी, पिकाची वाढ अधिक जोमदार होते आणि उत्पादनात वाढ होते. तणनियंत्रणाच्या या पद्धतीने हरभरा पिकाचे संरक्षण करून चांगल्या उत्पादनासाठी मदत मिळते. 👉स्रोत:- AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख