गुरु ज्ञानAgrostar
हरभरा पिकातील घाटे भरण्यासाठी उपाययोजना
हरभरा पिकात अधिक उत्पादन घेण्यासाठी घाटे भरणे आणि रोग-कीड नियंत्रण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घाटे अळी व मर रोग या समस्या वेळीच नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा. यामुळे पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता सुधारते.
👉🏻घाटे लागल्यानंतर ते चांगल्या प्रकारे भरण्यासाठी पुढील उपाययोजना करा:
- जिब्रेलिक ऍसिड 0.001% (स्टेलर): 2 मिली प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
- मायक्रो न्यूट्रिएंट (न्युट्रीप्रो ग्रेड 2): 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
👉🏻ही फवारणी घाट्यांच्या वाढीस चालना देऊन उत्पादनात महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणते. वेळीच योग्य व्यवस्थापन केल्यास हरभरा पिकाचे रोगमुक्त पोषण होते आणि अधिक दर्जेदार व भरघोस उत्पन्न मिळते.
या उपायांमुळे हरभरा उत्पादकांना चांगला लाभ मिळून उत्पन्नवाढ होईल.
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.