गुरु ज्ञानAgrostar
हरभरा पिकाच्या जोमदार वाढीसाठी उपायोजना
👉हरभऱ्याच्या पिकाची जोमदार वाढ आणि फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी सुरुवातीच्या अवस्थेत पोषक घटकांची आवश्यकता असते. यासाठी जमिनीत वापसा असताना योग्य फवारणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. पिकाच्या निरोगी वाढीसाठी आणि फुटवे वाढवण्यासाठी ट्रायकॉन्टेनॉल घटक असलेले पीक बुस्टर आणि चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट्स वापरणे फायदेशीर ठरते.
👉हरभरा पिकात ट्रायकन्टेनॉल घटक असलेले पीक बुस्टर पीक पोषक १ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे वापरल्यास पिकाची झपाट्याने वाढ होण्यास मदत मिळते. सोबतच, न्यूट्री प्रो चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट १ ग्रॅम प्रति लिटर पाणी यामध्ये मिसळून फवारणी करावी.
👉ही फवारणी पिकाच्या वाढीच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर केल्यास, पिकात फुटव्यांची संख्या वाढते, जोमदार वाढ साधली जाते, आणि उत्पादन क्षमतेत वाढ होते. त्यामुळे हरभरा पिकाच्या निरोगी आणि दर्जेदार उत्पादनासाठी या पद्धतीने पोषण व्यवस्थापन केल्यास चांगला परिणाम मिळतो.👉
👉🏻संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.