AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
स्ट्रॉबेरी लागवडीबद्दल माहिती
गुरु ज्ञानAgroStar
स्ट्रॉबेरी लागवडीबद्दल माहिती
👉🏻महाराष्ट्रातील ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी स्ट्रॉबेरीच्या उत्पादनासाठी अनुकूल मानला जातो. या काळातील थंड व मध्यम थंड हवामान स्ट्रॉबेरीच्या वाढीस उपयुक्त असते. विशेषतः पश्चिम घाटातील डोंगराळ भागात स्ट्रॉबेरीची लागवड ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात केली जाते. सपाट प्रदेशात मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला, म्हणजेच जुलै ते ऑगस्ट महिन्यात लागवड करणे फायदेशीर ठरते. 👉🏻स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी 30 ते 45 सेंमी उंच आणि 90 सेंमी रुंद गादीवाफे तयार करावेत. या पद्धतीत मातीची निचरा व्यवस्था सुधारते आणि झाडांची मुळे व्यवस्थित वाढतात. लागवडीसाठी दोन ओळींमधील अंतर साधारणतः 60 सेंमी ठेवावे, तर दोन रोपांमधील अंतर 30 सेंमी असावे. हे अंतर झाडांच्या योग्य वाढीस मदत करते. 👉🏻एक एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यासाठी साधारणतः 22 ते 25 हजार रोपांची गरज भासते. योग्य अंतर ठेवून रोपांची लागवड केल्यास स्ट्रॉबेरीची फळे आकाराने चांगली व दर्जेदार मिळतात, आणि शेवटी उत्पादन वाढण्यास मदत होते. 👉🏻संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0