AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पेरणी पूर्वीचे नियोजन कसे करावे?
गुरु ज्ञानAgroStar
सोयाबीन पेरणी पूर्वीचे नियोजन कसे करावे?
🌱शेताची मशागत खोल आणि चांगली करावी, 1 वेळा नांगरणी करून रान तापवून घ्यावे. मागील हंगामातील  पिकांचे अवशेष, धसकटे काढून टाकावी, मागील हंगामातील कोणतेच अवशेष राहणार नाही याची दक्षता घ्यावी. शेत तापल्यानंतर 1 आडवी आणि 1 उभी अशा दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेतामध्ये एकरी 10 ते 12 गाड्या चांगले कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या अगोदर मातीत मिसळून घ्यावे आणि जमिन पेरणीसाठी तयार करून घ्यावी. जमीन मध्यम स्वरूपाची तसेच भुसभुशीत व पाण्याच्या निचरा होणारी असावी, चोपण, क्षारपड जमिन निवडू नये. पेरणी करताना पावसाचा अंदाज घेवुन पेरणी करावी, सोयाबीन पेरणी 75 ते 100 मी. मी. पाऊस झाल्यानंतर करावी.धूळ पेरणी टाळावी. पेरणी पूर्वी रासायनिक खताची मात्रा द्यावी. सोयाबीन बियाणे बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
48
0
इतर लेख