AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सोयाबीन पिकातील तण व्यवस्थापन!
गुरु ज्ञानAgroStar
सोयाबीन पिकातील तण व्यवस्थापन!
🌱सोयाबीन पिकात योग्य वेळी तण नियंत्रित न केल्यास त्याचा परिणाम पिक वाढीवर व उत्पादनावर होऊन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. तसेच तण जास्त मोठे झाल्यास तण नियंत्रित करणे खूप कठीण होऊन जाते. यासाठी सोयाबीन पिकाची पेरणी झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांत तसेच तणांची अवस्था 2 ते 4 पानांची असताना गोल आणि लांब पानांच्या तणांच्या नियंत्रणासाठी इमाझेथापीर 70% घटक असलेले पॅराशूट ईझी तणनाशक 40 ग्रॅम प्रति एकर याप्रमाणे फवारणी करावी. एकरी 150 ते 200 लिटर पाण्याचा वापर करावा. फवारणी करताना जमिनीमध्ये ओल असावी. ढगाळ वातावरण असताना फवारणी करणे टाळावे तसेच फवारणी करताना फ्लॅट फॅन किंवा फ्लड जेट नोजल चा वापर करावा. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
0
इतर लेख