AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सूर्यफूल पिकासाठी खत व्यवस्थापन!🌻
गुरु ज्ञानअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
सूर्यफूल पिकासाठी खत व्यवस्थापन!🌻
➡️ सूर्यफूल पेरणीपूर्वी दोन आठवडे अगोदर जमिनीमध्ये आठ टन प्रतिहेक्‍टरी चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. ➡️ माती परीक्षण अहवालानुसार शिफारस मात्रेत बदल करून रासायनिक खताची मात्रा द्यावी. ➡️ रासायनिक खताच्या कार्यक्षम उपयोगासाठी पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी. ➡️ पेरणी करताना वरच्या छिद्रातून बियाणे तर खालच्या छिद्रातून रासायनिक खते पेरावेत. ➡️ पिकास नत्राची मात्रा अमोनियम सल्फेटमधून आणि स्फुरदाची मात्रा सिंगल सुपर फॉस्फेटमधून दिल्यास या खतामधून गंधक व कॅल्शियम या दुय्यम पोषण द्रव्याचा पुरवठा होऊन तेल व दाण्याचे उत्पादन अधिक मिळते. ➡️ पेरणी करतेवळी ५० टक्के नत्र, पूर्ण स्फुरद व पूर्ण पालाश जमिनीत मिसळावे. उरलेले ५० टक्के नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी कोळपणीनंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असताना मिसळावे. ➡️ बागायती क्षेत्राकरिता उरलेला नत्राचा हप्ता पेरणीनंतर ३० दिवसांनी व ६० दिवसांनी असा दोन वेळा विभागून द्यावा. सूक्ष्म अन्नद्रव्ये व्यवस्थापन : ➡️ गंधक हे वनस्पतीमध्ये तेलनिर्मिती करणारे अन्नद्रव्य आहे. राज्यातील बऱ्याचशा जमिनीमध्ये गंधकाची कमतरता आहे. ➡️ विदर्भामध्ये असे आढळले आहे की, २० किलो प्रति हेक्‍टरी गंधकाचे प्रमाण अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट खतामधून दिल्यास पिकाचे अधिक उत्पादन मिळते. ➡️ पुरेशी गंधकाची मात्रा पिकास दिल्यास १० ते ४५ टक्‍यांपर्यंत अतिरिक्त उत्पादनात वाढ दिसते. ➡️ फुलोरा अवस्थेमध्ये पाकळ्या बाहेर पडल्यानंतर ०.२ टक्के बोरॉनची फवारणी (दोन ग्रॅम बोरॉन प्रति लिटर पाणी) केली असता फुलातील दाणे भरण्याचे प्रमाण, तेल प्रमाण व उत्पादन वाढते. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
12
2