सल्लागार लेखअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सीताफळ पिकावरील पिठ्या ढेकूण नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, सिताफळ बागेत पिठ्या ढेकूण म्हणजेच मिली बग किडीचा प्रादुर्भाव झाल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात याविषयी संपूर्ण माहिती व मार्गदर्शन महिला प्रगतशील शेतकरी स्वप्ना मगर यांच्या द्वारे जाणून घेऊया.
➡️ हि कीड झाडाच्या सालीच्या खाली फळांच्या आणि फांद्यांच्या फटीत राहते चिवट कापसासारख्या पांढऱ्या पदार्थांच्या आवरणामध्ये ती अंडी घालते
➡️ पूर्ण वाढलेल्या किडीच्या शरीरावरतीही मेणचट पांढऱ्या रंगाचे आवरण असते.
➡️ हि कीड फळांचे खूप मोट्या प्रमाणात नुकसान करते , त्यामुळे फळांची गुणवत्ता खराब होते.
जैविक नियंत्रण - फवारणी
➡️ व्हर्टिसिलिअम लेकॅनी हि पावडर प्रति लिटर १ किलो + १ लिटर दूध - २०० लिटर पाण्यात मिसळावे , १ दिवस अगोदर भिजत घालावे .
➡️ हि फवारणी घेण्याअगोदर ८ ते १० दिवस कोणतेही बुरशीनाशक फवारणी घेऊ नये.
तसेच फवारणी घेतेवेळी जमीन ओली असावी आणि शक्य तो सायंकाळी फवारणीसाठी वेळ निवडावी तेव्हा हि बुरशी काम करते.
➡️ हि फवारणी जमिनीवर व झाडांवर पण घ्यावी.
रासायनिक नियंत्रण - फवारणी
➡️ क्विनलफॉस ३० मिली / १५ लिटर किंवा
➡️ वेटसील प्लस स्टिकर - ५ मिली / १५ लिटर फवारणी करावी.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.