AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
साखर निर्यातीत राज्याची आघाडी
कृषि वार्तापुढारी
साखर निर्यातीत राज्याची आघाडी
केंद्र सरकारकडून ५० लाख टन साखरेचा निर्यात कोटा राज्यनिहाय कारखान्यांना विभागून देण्यात आला असून, त्यापैकी २३ लाख टन साखर निर्यात पूर्ण झालेली आहे. त्यापैकी महाराष्ट्रात १५ लाख ५८ हजार टन इतक्या कोटयापैकी १० लाख टन साखरेची निर्यात झाली आहे. देशापातळीवरील विचार करता साखर निर्यातीत महाराष्ट्रातील कारखान्यांनी आघाडी घेतली आहे.
केंद्र सरकारकडून साखर निर्यात अनुदानापोटी कारखान्यांना ऊस गाळपाच्या प्रतिटनासाठी १३८.८० रू. अनुदान मंजूर करण्यात आलेले होते. त्यातून राज्यातील कारखान्यांना सुमारे १५३ कोटी ३५ लाख रूपये मिळाले आहेत. २३ लाख टनांपैकी १० लाख टन साखर निर्यात एकटया महाराष्ट्रातून झालेली आहे. उर्वरित राज्यांतून मिळून १३ लाख टन साखर निर्यात झाली आहे. संदर्भ – पुढारी, ११ जून २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
5
0