AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकार सब्सिडीच्या दरात उपलब्ध करणार डाळ!
कृषी वार्ताकृषी जागरण
सरकार सब्सिडीच्या दरात उपलब्ध करणार डाळ!
केंद्र सरकार राज्यांना किरकोळ विक्रीसाठी प्रक्रिया केलेली मूग आणि उडीद डाळ सब्सिडीच्या दरात उपलब्ध करुन देणार आहे. ग्राहक प्रकरण पाहणारे सचिव लीना नंदन यांनी ही माहिती दिली आहे. या निर्णयामुळे डाळींच्या वाढत्या किंमती कमी करण्यात मदत होईल,असे त्या म्हणाल्या. या निर्णयानुसार, मुग दाळ ९२ रुपये प्रति किलोग्रॅम तर उडीद दाळ ८४ ते ९६ रुपये प्रति किलोग्रॅम या दराने उपलब्ध केली जाणार आहेत. हे दर सध्या बाजारातील किंमतींपेक्षा खूप कमी आहेत. याविषयीचे वृत्त पीटीआयमध्ये आले आहे. हे नियम किरकोळ किंमतीतील वृद्ध कमी करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली असून मंत्रिमंडळाने त्याला नुकतीच मंजुरी दिली आहे. केंद्र सरकार राज्यांना प्रक्रिया केलेली मूग आणि उडीद दाळ ठोक प्रमाणात किंवा अर्धा किलोग्रॅमच्या पॅकेट मध्ये उपलब्ध करुन देणार आहे. दरम्यान राज्यांना या डाळी किंमत स्थिरीकरण निधी (पीएसएफ)च्या अंतर्गत गठित बंफर साठ्यातून उपलब्ध केली जाणार आहेत. राज्य आपल्या गरजेचा अभ्यास करुन याची विक्री करेल. दरम्यान या सब्सिडीच्या दरात नवीन येणाऱ्या पिकांचीही आवक दोन महिन्यासाठी केली जाणार आहे. यात किमान आधारभूत किंमत आणि इतर शुल्क समाविष्ट असतील. मूगसाठी १४ सप्टेंबरपासून निर्णय जारी करण्यात आला आहे. तर उडीदसाठी प्रक्रिया अजून चालू आहे. दरम्यान या डाळींच्या किंमतीत एसएसपीसह इतर शुल्क जोडण्यात येत आहे. म्हणजेच राज्यांना मूगाची डाळ ही ९२ रुपये प्रति किलोग्रॅम या दराने दिली जाईल. बाजारात या डाळीची किरकोळ विक्री किंमत हही १०० रुपये आहे. याच प्रमाणे राज्यांना बंफर साठ्यातून उडीद डाळ ८४ रुपये या दराने दिली जाणार आहे. स्वच्छ उडीद ९० रुपये आणि उदीड गोटा ९६ रुपये प्रति किलोग्रॅम भावान दिली जाणार आहे. नंदन यांनी सांगितले की, नवीन पीक बाजारात येईपर्यंत डाळींच्या किंमती वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संदर्भ -३० ऑक्टोबर २०२० कृषी जागरण,
20
0
इतर लेख