AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सरकार शेतकऱ्यांच्या शेतात लावत आहे सौर पंप; कसा घ्यावा फायदा !
कृषि वार्ताAgrostar
सरकार शेतकऱ्यांच्या शेतात लावत आहे सौर पंप; कसा घ्यावा फायदा !
➡️जर तुम्ही सोलर ऊर्जेशी संबंधित एखादा व्यवसाय सुरु करु इच्छित असाल तर सरकारच्या पीएम कुसुम योजनेशी जोडलं जाण्याचा विचार करू शकता. शेतकऱ्यांच्या पिकाला उत्तम पद्धतीने सिंचन करता यावं, यासाठी सरकरानं अनेक योजना सुरु केल्या आहेत. शेतकऱ्यांना सौरऊर्जेवर चालणारा सौर पंप देण्याकरिता प्रधानमंत्री कुसुम योजना सुरु आहे. या अंतर्गत सोलर पंप लावण्याकरिता मोठ्या प्रमाणात सबसिडी दिली जात आहे. अनुदानामुळे शेतकऱ्यांना सौरपंपासाठी खूपच कमी पैसे द्यावे लागतात. ➡️ या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सोलर पॅनल मिळतात. ज्यातून वीज उत्पन्न होते. जेवढी आवश्यक आहे, तेवढी वीज वापरून उरलेली वीज सरकारला विकून पैसेही कमावता येऊ शकतात. ➡️सौर पंप कमावण्याचं साधन : शेतीमधील प्रमुख समस्या म्हणजे भारनियमन. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागते. त्यामुळे सौरऊर्जेवर चालणारे कृषीपंप आल्यास शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून 30 टक्के आणि राज्य सरकारकडून 45 टक्के अनुदान दिलं जाते. सर्व मिळून शेतकऱ्यांना सोलर पंप खरेदीसाठी 75 टक्के अनुदान दिलं जाईल. शेतकऱ्यांना फक्त 25 टक्के पैसे द्यावे लागतील. या पंपांना विम्याचं संरक्षणदेखील मिळतं. या योजनेचा हेतू सौरउर्जेवर चालणाऱ्या सौर पंपांना प्रोत्साहन देणे हा होय. देशात आतापर्यंत 3 कोटी सौरपंप लावले गेले आहेत. या योजनेअंतर्गत वीज आणि डिझेलवर चालणारी सौरपंप सौर उर्जेवर चालणाऱ्या पंपात बदलले जातील. सौर पॅनलच्या माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा सौरपंपासाठी वापरली जाईल आणि वीज शिल्लक राहिल्यास तुम्ही ती विकू देखील शकता. ➡️कसा होईल फायदा : प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत राज्यांनी वेगवेगळ्या वेबसाईट बनवल्या आहेत. जर तुम्ही या योजनेचा फायदा उचलू इच्छित असाल तर तुम्ही सरकारी वेबसाईटला भेट द्या. अधिक माहितीसाठी https://mnre.gov.in वेबसाईटला भेट द्या. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
73
14
इतर लेख