AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान

सरकार आता पशुंसाठी आणणार आधार कार्ड
पशुपालनकृषी जागरण
सरकार आता पशुंसाठी आणणार आधार कार्ड
•आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. आता हे आधार कार्ड पशुंना मिळणार आहे. हो खरंच आता आपल्या जनावरांना आधार क्रमांक असणार आहे. याविषयीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. •पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई -गोपाला ॲपची सुरुवात केली. •माननीय नरेंद्र मोदी म्हणाले की जनावरांसाठी आधार नंबर आवश्यक आहे. त्याच्यामुळे जनावरांच्या बाबतीतील सगळी माहिती प्राप्त केली जाऊ शकते. •भारतामध्ये सगळ्यात जनावरांची टॅगिंग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. •प्रत्येक गाय आणि म्हैशींसाठी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर लागू करण्यात येणार आहे. त्याचा फायदा असा होईल, की पशुपालन आपल्या घरी बसून सॉफ्टवेअरच्या मदतीने आपल्या जनावरांविषयी माहिती प्राप्त करू शकतात. •जनावरांचे लसीकरण, चिकित्सा इत्यादी सगळ्या प्रकारची कामे करणे फार सोपे होणार आहे. •सरकारचा प्रयत्न आहे की, पशुपालनाच्या मदतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक आवक वाढवणे हा महत्वाचे उद्दिष्ट आहे.. •या योजनेच्याद्वारे आधार नंबरसाठी गाय,म्हैस इत्यादी पाळीव प्राण्यांच्या कानामध्ये 8 ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग लावला जाईल व या टॅबवर बारा अंकांचा आधार नंबर असेल. •प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत चार करोड गाय आणि म्हशींसाठी आधार कार्ड बनवले गेले आहे. भारतामध्ये कमीत कमी तीस कोटी पेक्षा जास्त गाय आणि म्हशीं आहेत. •या योजनेद्वारे अभियान चालवून प्रत्येक जनावरांची टॅगिंग करण्यात येणार आहे. भारत जगातला सगळ्यात मोठा दूध उत्पादक देश आहे.
संदर्भ- कृषी जागरण, यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका! माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा.
52
12