गुरु ज्ञानAgroStar
शेवगा पिकातील छाटणी व्यवस्थापन
👉शेवग्याचे उत्पादन मुख्यतः छाटणीच्या तंत्रावर अवलंबून असते. योग्य प्रकारे छाटणी न केल्यास शेवग्याचा एकच मुख्य शेंडा वाढतो, ज्यामुळे उत्पादन कमी होते आणि शेंगांची काढणी करणे अवघड होते. त्यामुळे शेवगा लागवडीनंतर 4 ते 6 महिन्यांनी जमिनीपासून अंदाजे 1 ते 1.5 फूट अंतरावर मुख्य शेंडा खुडणे गरजेचे आहे. जर जुनी बाग असेल, तर शेंगांची काढणी झाल्यावर जमिनीपासून 2 ते 3 फूट उंचीवर झाडाची छाटणी करावी, ज्यामुळे मुख्य शेंडा न वाढता बाजूला नवीन फांद्या फुटतात आणि शेवग्याचा बहार वाढतो.
👉छाटणी केल्यानंतर त्वरित रोग आणि किड नियंत्रणासाठी फवारणी करावी. यासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईड 50% डब्ल्यू पी असणारे कूपर-1 बुरशीनाशक 2.5 ग्रॅम आणि क्लोरोपायरीफॉस 20% ईसी असणारे ऍग्लोरो कीटकनाशक 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे उपाय फांद्या निरोगी ठेवण्यास आणि उत्पादन वाढविण्यास मदत करतात.
👉🏻संदर्भ : Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.