AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतीत वर्मीवॉश वापरण्याचे फायदे!
जैविक शेतीAgrostar
शेतीत वर्मीवॉश वापरण्याचे फायदे!
➡️शेतीत वर्मीवॉशचा वापर केल्याने जमिनीची सुपीकता वाढीस लागते. सोबतच पिकांच्या वाढीचा वेगही वाढतो.शेतीत परिणामी शेतकऱ्यांचा कल सेंद्रिय किंवा संतुलित खतांकडे वळालेला दिसून येतोय. सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ आणि गांडूळ खताला अनन्यसाधारण महत्व आहे. गांडूळाला तर शेतकऱ्यांचा मित्र मानले जाते. गांडूळ अर्कही उत्तम पिकवर्धक मानला जातो. गांडूळ अर्कामध्ये मुख्य अन्नद्रव्याव्यतिरिक्त सुक्ष्म मूलद्रव्येही मुबलक प्रमाणात असतात. ➡️गांडूळ अर्कामधील घटक पिकांना त्वरित उपलब्ध होतात. परिणामी पिकांची रोगप्रतिकार क्षमता टिकून राहते. गांडूळ खत बनविण्यासाठी वापरली जाणारी गांडुळे वेगळी असतात. यांचे वैशिष्ट्य म्हणजे यांनी खाल्लेल्या सेंद्रिय घटकापैकी केवळ १० टक्के भाग हा स्वतःच्या पोषणासाठी वापरला जातो. उर्वरित भाग त्यांच्या विष्ठेद्वारे शरीराबाहेर टाकला जातो. त्यालाच आपण गांडूळखत म्हणतो. गांडूळखताची निर्मिती होत असताना गांडूळ अर्कही मिळत असते. ➡️गांडूळ अर्काचा वापर करीत असताना पिक फुलोऱ्याच्या अवस्थेत आल्यावर १० दिवसाच्या अंतराने वर्मीवॉश पाच टक्के मात्रेत दोन फवारण्या कराव्यात. वर्मीवॉश मधील घटक- 1.सामू- ६.८ 2.सेंद्रिय कर्ब- ०.०३ % 3.नत्र-०.००५ % 4.स्फुरद- ०.००२५ % 5.पालाश- ०.०६३% 6.कॅल्शियम -७८६ मिलीग्रॅम प्रति किलो. ➡️एक लिटर वर्मीवॉश आणि एक लिटर गोमुत्र, १० लिटर पाण्यात एकत्र करून वापरू शकतो. हे द्रावण एक जैविक कीडनाशक आणि द्रवरूप खत म्हणून कार्य करते. वर्मीवॉशचा वापर केल्याने पिकांवरील मावा, फुलकिडे यांसारख्या रस शोषणाऱ्या कीटकांचे प्रमाण कमी होते. यासोबतच पिकांच्या प्रकाशसंश्लेषण क्रियेत वाढ होते. परिणामी पिकांची उत्पादनक्षमता वाढते. जमिनीतील सूक्ष्म जीवाणुची संख्या वाढते. वनस्पतींची रोगप्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते. ➡️ संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
1