AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतीच्या मशागतीसाठी वापरा नवीन यंत्र !
कृषी यांत्रिकीकरणlive 24 team
शेतीच्या मशागतीसाठी वापरा नवीन यंत्र !
➡️आता शेत चांगले मऊ करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहेत. त्यात डिस्क हॅरो हे शेताच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचे कृषी उपकरण आहे .याचा उपयोग माती फोडून मऊ करण्यासाठी केला जातो. ➡️डिस्क हॅरोची वैशिष्ट्ये : ट्रॅक्टर चालित डिस्क हॅरो ट्रॅक्टरच्या शक्तीने चालवले जाते.त्यात गोल मेटल डिस्क असतात.या गोल डिस्क्सचा आकार सुमारे 5 ते 7 सें.मी असतो.डिस्क हॅरोचा वापर : शेताच्या पहिल्या नांगरणीनंतर डिस्क हॅरो वापरतात .शेतातील मातीचे मोठे तुकडे फोडण्यासाठी डिस्क हॅरो वापरतात.हे तणांचे छोटे तुकडे जमिनीत मिसळते. त्याच्या वापराने जमीन भुसभुशीत होऊन शेत पेरणीसाठी योग्य बनते. ➡️डिस्क हॅरोचे फायदे : १.त्यामुळे शेतीची तयारी अगदी सोपी होते. २.शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो. ३.उत्पादनात 2 ते 5 टक्क्यांनी वाढ होते. ➡️डिस्क हॅरो किंमत :वेगवेगळ्या कंपन्यांचे डिस्क हॅरो बाजारात उपलब्ध आहेत. त्याची किंमत आकार आणि गुणवत्तेनुसार बदलू शकते. सामान्य ट्रॅक्टर चालविलेल्या डिस्क हॅरोची किंमत रु. 30,000 ते रु. 1 लाख पर्यंत असते ➡️संदर्भ:- Live २४ team हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
3