AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतामध्ये एकसारखे खते देण्यासाठी फर्टिलायझर ब्रॉडकास्टर हे यंत्र ठरेल उपयोगी!
कृषी यांत्रिकीकरणkrishi jagran
शेतामध्ये एकसारखे खते देण्यासाठी फर्टिलायझर ब्रॉडकास्टर हे यंत्र ठरेल उपयोगी!
➡️पिकांच्या वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळावे यासाठी आपण पिकांना रासायनिक खते देतो.परंतु बऱ्याचदा ही खते देताना आपण ते हाताने देतो. परंतु हाताने खत देत असताना ते पिकाला एक सारख्या प्रमाणात दिले जातेच असे नाही. ➡️या समस्येवर उपाय म्हणून ट्रॅक्‍टरचलित फर्टीलायझर ब्रॉडकास्टर हे यंत्राचा वापर केला तर पिकांना एकसमान पद्धतीने एका प्रमाणात खते देणे सुलभ होऊ शकते. या लेखामध्ये आपण या यंत्र विषयी माहिती घेऊ. VIDEO - फर्टीलायझर ब्रॉडकास्टरयंत्राची रचना ➡️या यंत्रामध्ये फ्रेम म्हणजे सांगाडा हा एक मुख्य घटक असून यावर या यंत्राचे इतर दुसरे घटक जोडलेले असतात. या सांगाड्याची जी पुढची बाजू असते ती ट्रॅक्टरच्या तीन पॉईंट लिंकेज प्रणालीला जोडली जाते. याला एका धातूच्या शीट पासून शंकूच्या आकाराचे एक नरसाळे बसवलेले असते. यामध्ये आपल्याला जे खत द्यायचे आहे ते टाकले जाते. ➡️याच्या खाली एक सप्रेडींग तबकडी असते. याद्वारे युनिटवर गुरुत्वाकर्षणामुळे दोन ओपनिंग द्वारे खत पडते. त्यासोबतच वितरक स्प्रेडर सिस्टीम मध्ये एक डिस्क असते ती उभ्याअक्षाभोवती फिरते. या डिशचा रोटेशन मुळे तयार झालेल्या केंद्र प्रसारक बलामुळे खत पसरली जाते. या सगळ्या वितरण प्रणाली मुळे खते पिकांना एक सारखे दिले जाते व इतकेच नाही तर गरजेनुसार १२ ते १४ मीटर अंतरापर्यंत पसरविता येते. संदर्भ:-krishi jagran, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
4
इतर लेख