AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतमाल वाहतुकीसाठी  मिळणार 75 टक्के अनुदान!
योजना व अनुदानAgrostar
शेतमाल वाहतुकीसाठी मिळणार 75 टक्के अनुदान!
➡️ महाराष्ट्रातून शेतमालाच्या आंतरराज्यीय व्यापारास चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत रस्ते वाहतूक अनुदान योजना राबविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे योजनेच्या दिनांकापासून दि. ३१ मार्च २०२३ या कालावधीपर्यंत देशांतर्गत रस्ते वाहतूक भाड्यामध्ये अनुदान देण्यासाठी योजना जाहिर करण्यात आली आहे. राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या व शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्था योजनेअंतर्गत अनुदान घेण्यासाठी पात्र असतील. या योजनेमध्ये रस्तेमार्गे प्रत्यक्ष वाहतूक होणार्‍या शेतमालावर अनुदान मिळणार आहे. ➡️महत्वाचे म्हणजे शेतमाल प्रत्यक्ष विक्री झाल्यानंतरच अनुदान मिळेल. राज्यातील नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादकांच्या सहकारी संस्थांच्या सभासदांनी स्वत: उत्पादित केलेला शेतमालच संबधीत राज्यामध्ये पाठवावे लागेल. या योजनेअंतर्गत प्रत्यक्ष वाहतूक केलेल्या अंतरानुसार अनुदान दिले जाईल. ➡️अंतरानुसार अनुदान मिळेल : १) किमान ३५० ते ७५० कि. मी. पर्यंत वाहतूक खर्चाच्या ५० टक्के अथवा कमाल मर्यादा रु.२० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम. २) ७५१ ते १००० कि.मी. पर्यंत वाहतूक खर्चाच्या ५० टक्के अथवा कमाल मर्यादा रु.३० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम. ३) १००१ ते १५०० कि.मी. पर्यंत वाहतूक खर्चाच्या ५० टक्के अथवा कमाल मर्यादा रु.४० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम. ४) १५०१ ते २००० कि.मी.पर्यंत वाहतूक खर्चाच्या ५० टक्के अथवा कमाल मर्यादा रु. ५० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम. ५) २००१ कि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वाहतूक खर्चाच्या ५० टक्के अथवा कमाल मर्यादा रु.६० हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम. ६) सिक्कीम, आसाम, अरूणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम,मेघालय व त्रिपुरा या राज्यासाठी वाहतूक खर्चाच्या ५० टक्के अथवा कमाल मर्यादा रु.७५ हजार यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम या योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतमाल उत्पादक सहकारी संस्था/उत्पादक कंपनीस एका आर्थिक वर्षात कमाल रू.३.०० लाख एवढे वाहतूक दिले जाणार. मात्र अनुदान केवळ महाराष्ट्रातून इतर राज्यात केलेल्या एकेरी वाहतूकीस लागू असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या कार्यलयांशी संपर्क साधू शकता. ➡️संदर्भ: Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
0
इतर लेख