AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतमाल निर्यातीसाठी शासनाच्या सुविधा!
कृषी वार्ताAgrostar
शेतमाल निर्यातीसाठी शासनाच्या सुविधा!
➡️बरेच वेळा शेत मालाला योग्य भाव मिळत नाही. अश्या वेळी आपण शेतमाल बाहेर निर्यात देखील करू शकतो. शेतमाल निर्यातीमध्ये ज्या देशाला तुम्ही निर्यात करणार आहात त्या देशाचे आयात धोरण अगोदर नेमके काय आहे? याबद्दल पुरेशी माहिती असणे गरजेचे आहे. ➡️कारण तुम्ही पाठवत असलेल्या शेतमालाची प्रत दर्जेदार असणे गरजेचे असून फळे डागाळलेली नसावी, इत्यादी गोष्टींना खूप महत्त्व आहे. तसेच तुम्ही वापरत असलेले पॅकेजिंग साहित्य सुद्धा दर्जेदार असणे गरजेचे आहे. ताजी फळे तसेच भाजीपाला व फुले यांचे निर्यात करण्याकरता त्यांचे हाताळणी योग्य रीतीने होणे गरजेचे असते ➡️तसेच शेतमालाची प्रतवारी व साठवणूक इत्यादी काढणी पश्चात तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच मालाची ग्रेडिंग, त्याची पॅकिंग, पूर्व शीतकरण व शीतगृह यासारख्या सुविधा उपलब्ध असणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे असा नाशवंत शेतमालाच्या ठिकाणी उत्पादित होतो, त्या ठिकाणीच शीतगृहाची उभारणी खूप महत्त्वाची आहे. ➡️महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने महत्त्वपूर्ण गोष्टींचा विचार करून निर्यात सुविधा केंद्र, फळे व भाजीपाला आधुनिक निर्यात सुविधा केंद्र व फुले निर्यात सुविधा केंद्रांची उभारणी केलेली आहे.तसेच या केंद्रांमध्ये प्रशीतकरण तसेच कोल्ड स्टोरेज, फळांसाठी रायपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा तसेच प्रतवारी व पॅकिंग त्यासाठी लागणारी आधुनिक यंत्र साम्राज्य उभारणी या माध्यमातून करण्यात आले आहे. ➡️या निर्यात सुविधा केंद्रांवर कोल्डरूम तसेच प्रशीतकरण, प्लास्टिक क्रेट इत्यादी आवश्यक सुविधा देखील पुरवल्या जातात तसेच यासाठी लागणारा विद्युत पुरवठा हा देखील कृषिधराप्रमाणे ठेवण्यात आलेला आहे. काही निर्यात सुविधा केंद्रांवर एक्सप्रेस फिडरवरून विजेचा पुरवठा घेण्यात आला आहे.या सर्व सोयींनी युक्त अशा निर्यात सुविधा केंद्रांचा जास्तीत जास्त उपयोग शेतकऱ्यांनी करून घ्यावा. ➡️संदर्भ :Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
3
इतर लेख