AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित!
कृषी वार्ताअॅग्रोवन
शेततळे अनुदानाचे वीस कोटी वितरित!
👉राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेतून गेल्या वर्षभरापासून नवीन शेततळ्याची कामे बंदच आहेत. मात्र कामे बंद होण्याअगोदर मंजुरी मिळाल्यानंतर कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शासनाने २० कोटींचा निधी वितरित केला आहे. 👉पाच वर्षात राज्य शासनाने शेततळ्याची १ लाख १२ हजार ३११ कामे करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र आतापर्यंत १ लाख ४९ हजार ५९० कामे पूर्ण झाली आहेत. त्यातील अनेकांना कामे करूनही अनुदान मिळाले नाही. 👉शेतकऱ्यांनी कमी पाण्यात चांगले उत्पन्न घ्यावे यासाठी शासनाच्या कृषी विभागाने सुरू केलेली ‘मागेल त्याला शेततळे’ योजना दुष्काळी भागासाठी अत्यंत लाभदायक ठरली असल्याचा अनुभव आहे. एका शेतकऱ्याला शासन जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये अनुदान देते. 👉कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना शासनाने स्थगित केली आहे. मात्र त्याआधी मंजुरी देऊन कार्यारंभ आदेश दिले. नंतर ती शेततळी शेतकरी शेतकऱ्यांनी पूर्ण केली. मात्र त्याचे अनुदान अजूनही मिळालेले नाही. 👉२०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांत राज्यामध्ये अनुदानापोटी ६३६ कोटी २७ लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यात आता वीस कोटीची भर पडली आहे. या वर्षी कृषी विभागाच्या जिल्हास्तरावरून आलेल्या अहवालानुसार शेतकऱ्यांना अनुदान व कंत्राटी कामगार मानधानापोटी ८४ कोटी १४ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानुसार २० कोटी नुकतेच प्राप्त झाले असून, ती रक्कम जिल्हास्तरावर वितरित केली आहे. 👉वितरित केलेल्या निधीत कोकण विभागाला २९ लाख ७७ हजार, नाशिक विभागाला ६७ लाख ५७ हजार, पुणे विभागाला ९ कोटी ९१ लाख, कोल्हापूर विभागाला २ कोटी ६१ लाख, औरंगाबाद विभागाला २ कोटी ७२ लाख, लातूर विभागाला ९९ लाख ५० हजार, अमरावती विभागाला ३३ लाख व नागपूर विभागाला २ कोटी ३० लाख रुपये वितरित केले आहेत. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
28
4
इतर लेख