AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी स्पर्धा, राज्य सरकारकडून मिळणार ही मोठी बक्षिसे!
समाचारAgrostar
शेतकऱ्यांसाठी स्पर्धा, राज्य सरकारकडून मिळणार ही मोठी बक्षिसे!
👉🏻शेतीतून जास्तीत जास्त पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग केले जातात. कमी खर्चात जास्त उत्पादन घेतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत पीक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.. त्यात शेतकऱ्यांना राज्य, विभाग, जिल्हा व तालुका स्तरावर बक्षिसे दिली जाणार आहेत. 👉🏻कृषी विभागामार्फत आयोजित या पीक स्पर्धेत खरीप हंगामातील 11 पिकांचा समावेश करण्यात आला आहे.. त्यात भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुल या पिकांचा समावेश आहे. कमी खर्चात या पिकांचे जास्त उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे.. स्पर्धेत भाग घेण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. 👉🏻 प्रत्येक तालुक्यात किमान स्पर्धक संख्या सर्वसाधारण गटासाठी 10, तर आदिवासी गटासाठी 5 असेल. शेतकऱ्याने कमीत कमी 10 आर क्षेत्रावर पिकाची सलग लागवड केलेली असावी. संबंधित पिकाची स्पर्धा तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पीक कापणी प्रयोगाची किमान संख्या सर्वसाधारण गटासाठी 5 व आदिवासी गटासाठी 4 असेल. 👉🏻शेतकऱ्यांना एका वेळी एकापेक्षा जास्त पिकांच्या स्पर्धेतही भाग घेता येईल.. स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी प्रवेश शुल्क सर्व गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये आहे.. स्पर्धकांनी विहित नमुन्यात अर्ज भरून प्रवेश शुल्क चलन, 7/12 व 8-अ उतारा व जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) अर्जासोबत कृषी कार्यालयात मुदतीपूर्वी सादर करावे. 👉🏻किती बक्षिसे मिळणार : 👉🏻तालुका पातळी प्रथम- 5 हजार रुपये, द्वितीय- 3 हजार रुपये तृतीय- 2 हजार रुपये 👉🏻जिल्हा पातळी प्रथम – 10 हजार रुपये, द्वितीय – 7 हजार रुपये तृतीय 5 हजार रुपये 👉🏻विभाग स्तर प्रथम 25 हजार रुपये, द्वितीय 20 हजार रुपये तृतीय 15 हजार रुपये 👉🏻राज्य स्तर प्रथम 50 हजार रुपये, द्वितीय 40 हजार रुपये तृतीय 30 हजार रुपये. 👉🏻प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच त्यांच्या प्रयोगाचा फायदा इतर शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी राज्य सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे.. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.. 👉🏻संदर्भ: Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
30
4
इतर लेख