AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांसाठी NMNF पोर्टल सुरु!
जैविक शेतीAgrostar
शेतकऱ्यांसाठी NMNF पोर्टल सुरु!
➡️शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीमध्ये मदत करण्यासाठी सरकारने एक पोर्टल सुरू केले आहे. कृषी मंत्रालयाने विकसित केलेल्या नॅशनल मिशन फॉर नॅचरल फार्मिंग (NMNF) ची घोषणा नवी दिल्ली येथे झालेल्या कृषी मिशनच्या पहिल्या सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आली. ➡️पोर्टलमध्ये मिशन प्रोफाइल, संसाधने, शेतीमधील प्रगती, शेतकरी नोंदणी आणि ब्लॉग इत्यादी सर्व माहिती आहे. समितीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या वेबसाइटमुळे देशातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यास प्रोत्साहन मिळेल. या संदर्भात कृषी मंत्री तोमर यांनी अधिकाऱ्यांना राज्य सरकार आणि केंद्रीय विभागांशी समन्वय साधण्याचे निर्देश दिले जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचा माल विकणे सोपे होईल. ➡️17 राज्यांमधील 4.78 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन सेंद्रिय प्रकल्पांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत ७.३३ लाख शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती सुरू केली आहे. गावांमध्ये स्वच्छता आणि प्रकल्प प्रशिक्षणासाठी 23 हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चार राज्यांमध्ये गंगा नदीच्या काठावर १.४८ लाख हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक शेती केली जात आहे. ➡️या वेबसाइटवर क्लिक करून शेतकरी पोर्टलला भेट देऊ शकतात. http://naturalfarming.dac.gov.in ➡️संदर्भ : Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
1