AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांनो तुमच्या परिसरातील FPO खरेदी करणार शेतमाल!
समाचारkrishi jagran
शेतकऱ्यांनो तुमच्या परिसरातील FPO खरेदी करणार शेतमाल!
शेतीमालाला किमान दर मिळावा म्हणून केंद्र सरकारच्या माध्यमातून हमीभाव केंद्र उभारली जात आहेत. स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची सोय व्हावी म्हणून आता नवा पर्याय खुला करण्यात आला आहे. शेती उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमालाची खरेदी केली जात नव्हती, पण यंदाच्या खरीप हंगामापासून उत्पादक कंपन्या देखील हमीभावाने हरभऱ्याची खरेदी करणार आहे. हरभऱ्याला केंद्र सरकारने ५ हजार २३० रुपये दर ठरवून देण्यात आला आहे. त्याच दराप्रमाणे हरभऱ्याची खरेदी ही शेतकरी उत्पादक कंपन्या करणार आहेत. याची सुरवात मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्यापासून झाली आहे. दोन्ही जिल्ह्यात २१ ठिकाणी खरेदी केंद्र उभारण्यात आली आहेत. आता पणन महासंघाच्या माध्यमातून उभी राहणारी खरेदी केंद्र ही तालुक्याच्या किंवा मंडळाच्या ठिकाणी होती. त्यामुळे वाहतूक आणि इतर खर्च करुन शेतकऱ्यांना शेतीमाल दाखल करावा लागत होता. पण आता शेतकरी उत्पादक कंपन्याही खरेदी केंद्राच्या माध्यमातून हरभऱ्याची खरेदी करणार आहेत. खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करायची असल्यास शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. याकरिता चालू हंगामातील हरभऱ्याचा पीक पेरा, नोंद असलेला सातबारा, होल्डींग सातबारा, आधार कार्ड, बॅंक खात्याचा तपशील ही माहिती अदा करावी लागणार आहे. ‘नाफेड’च्यावतीने सुरु करण्यात आलेली खरेदी केंद्र ही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ठिकाणी उभी केली जाणार आहेत. १५ मार्चपर्यंत नोंदणी आणि त्यानंतर थेट विक्री होणार आहे. संदर्भ:-Krishi Jagran, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
5
1
इतर लेख