AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांनो! आता एकरकमी भरा अर्धेच वीजबिल!
कृषी वार्ताअ‍ॅग्रोवन
शेतकऱ्यांनो! आता एकरकमी भरा अर्धेच वीजबिल!
➡️राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण महाविकास आघाडी सरकारने कायम ठेवले आहे. मंत्रिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत कृषिपंपांच्या वीजबिलाची थकबाकी एकरकमी भरल्यास ५० टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कृषिपंपांसाठी तत्काळ वीजजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री यांनी राहुरी येथे दिली. ➡️ राज्यातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांकडे सुमारे ४० हजार कोटींची थकबाकी आहे. त्यासाठी शासनातर्फे सवलत योजना लागू केली आहे. त्यानुसार मागील पाच वर्षांतील विलंबआकार रद्द केला जाईल. थकबाकी एकरकमी भरल्यास ५० टक्के वीजबिल माफी दिली जाईल. या योजनेनुसार सर्व कृषी ग्राहकांना येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने दिवसा कायमस्वरूपी आठ तास वीजपुरवठा करण्यात येईल. ➡️ वसुली रकमेतून कृषी फीडर व वितरण रोहित्रांवरील मीटर अद्ययावत करणे, दुरुस्ती करणे आदी कामे केली जातील. सद्यःस्थितीत कार्यरत असणाऱ्या सर्व कृषिपंपांना कपॅसिटर बसविण्यात येणार आहेत. ➡️वीजबिल वसुलीसाठी ग्रामविद्युत व्यवस्थापक, ग्रामपंचायत, शेतकरी सहकारी संस्था, महिला बचतगट यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. कृषी पंपांची पाच वर्षांपूर्वीची व पाच वर्षांपर्यंतची थकबाकी व्याज व विलंब आकारात सूट देऊन सुधारित करण्यात येणार आहे. ➡️थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी थकबाकीची रक्कम तीन वर्षांत भरण्याची सवलत आहे. वसूल रकमेपैकी ३३ टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात, ३३ टक्के रक्कम संबंधित जिल्ह्यात व ३३ टक्के रक्कम राज्यातील कृषिपंप वीजजोडणीच्या पायाभूत सुविधा बळकटी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. प्रतिक्रिया ➡️मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत दर वर्षी एक लाख सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. कृषिपंपांना दर दिवशी आठ तास वीजपुरवठा करण्याकरिता विद्युत वितरण उपकेंद्र स्तरावर विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प उभारून, वीजनिर्मिती करून वीजपुरवठा करण्याची दीर्घकालीन योजना राबविण्यात येणार आहे अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
39
7
इतर लेख