AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतकऱ्यांना सरकार देणार मोफत भाज्या, कडधान्य..!
कृषी वार्ताAgrostar
शेतकऱ्यांना सरकार देणार मोफत भाज्या, कडधान्य..!
➡️राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. राज्य सरकारने विकासाची पंचसूत्री स्वीकारली असून कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करत ठाकरे यांनी यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. ➡️शेतकरी बांधवांच्या आरोग्यासाठी पोषक गुणधर्म असणाऱ्या भाज्या, कडधान्यांचे दहा वाण राज्य सरकार आता शेतकरी बांधवांना मोफत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. देशाच्या जडणघडणीत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे. शेतकरी यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ➡️ज्या राज्यात शेतकरी सुखी ते राज्य सुखी. शेतकरी बांधव कष्ट करत असताना त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे आता राज्य सरकारने विकासाची पंचसूत्री स्वीकारली आहे. यामध्ये कृषी क्षेत्राला प्रथम प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान बदलेल, अशी आशा आहे. ➡️मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाने नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. कोरोना काळात शेतकऱ्यांचे अनेकदा मोठे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांना आर्थिक फटका बसला.यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे, कृषी विभागाचे खरीप हंगामाचे नियोजन समाधानकारक आहे, यामुळे यंदाचा खरीप हंगाम यशस्वी होईल, यासाठी कृषी विभाग आता कामाला लागला आहे खरीप हंगाम पूर्व बैठकीत मागील वर्षी झालेल्या कृषी उत्पादनाचा अंदाज घेण्यात आला. कृषी विभाग योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करत असतो, बाब समाधानाची आहे. या विभागाला आवश्यक निधी उपलब्ध करू देण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. यामुळे यंदा उत्पादन वाढेल अशी आशा आहे. ➡️संदर्भ:- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
22
3
इतर लेख