कृषि वार्ताAgroStar
शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखांपर्यंत कर्ज!
➡️रासायनिक खतांच्या वापरामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा विचार केंद्र सरकारचा करत असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री यांनी दिली आहे.शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीतून पिकवलेले धान्य, फळे, भाजीपाला विकल्यास शेतकऱ्यांना दीडपट अधिक 'भाव मिळेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
➡️शेतकऱ्यांना प्रबोधन केले जाईल:
नैसर्गिक शेतीच्या अभ्यासासाठी देशातील कृषी विद्यापीठांमध्ये प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली. तर नैसर्गिक शेतीचा प्रचार करण्यासाठी देशातील १ कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीबद्दल जागरूक केले जाईल.
➡️पीक कर्जाची मर्यादा वाढवणार:
कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, किसान क्रेडिट कार्ड असलेल्या छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना व्याज अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे. पीक काढल्यानंतर सहा महिन्यांसाठी कर्ज देखील उपलब्ध करूण देण्यात येणार आहे. केंद्र सरकार सुधारित व्याज अनुदान योजना (MISS) अंतर्गत अल्प मुदतीच्या पीक कर्जाची उच्च मर्यादा ३ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्याचा विचार करत आहे.
➡️राज्य सरकारांसह शेतकरी सवलतीच्या दरात अधिक कर्ज आणि पीक कर्जाची मर्यादा वाढविण्याची मागणी करत आहेत. त्या प्रमाणे सध्या हा प्रस्ताव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. तर हा प्रस्ताव मंजूर झाल्यास शेतकरी सवलतीच्या दरात अधिक कर्ज घेऊ शकतील. तसेच शेतकरी किसान क्रेडिट कार्डवरून ७ टक्के सवलतीच्या वार्षिक व्याजदराने कर्ज घेऊ शकतील. तर वेळेवर परतफेड झाल्यास ४ टक्के व्याजदराने कर्ज मिळेल.
➡️संदर्भ: Agrostar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.