AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेलींना आधार व वळण देण्याची पद्धत!
गुरु ज्ञानतुषार भट
वेलींना आधार व वळण देण्याची पद्धत!
🌱वेलींना आधार आणि वळण देणे अत्यंत गरजेचे आणि फायदेशीर आहे. जमिनीत बिया टोकल्यानंतर 8 ते 12 दिवसांत रोपे उगवून येतात. रोप उगवल्यानंतर वेल उंच वाढायच्या अगोदरच मांडवाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. वेलीच्या जवळ एक फुटाच्या लहान काठ्या रोवून घाव्यात. 🌱त्यानतंर त्या काठ्यांना सुतळी बांधावी व वेलीच्या अगदी बरोबर वरून आडव्या जाणाऱ्या तारेला दोन पदरी सुतळी बांधावी. त्यानंतर वेली जशा वाढतील तश्या त्या तणाव्यांच्या साहाय्याने दोरीवर चढत जातील. वेली दोरीच्या हेलकाऱ्याने खाली पडणार नाहीत आणि वेलीचा शेंडा मोडणार नाही याची काळजी घ्यावी. 🌱वेली वाढत असतानाच प्रत्येक पानाच्या बेचक्यात येणाऱ्या बगल फुटी काढणे गरजेचे आहे. वेल तारेच्या खाली एका फुटावर आल्यानंतर वेलीच्या बगलफुटी काढणे बंद करावे. यावेळी 3 ते 4 चांगल्या फुटी येऊन द्याव्यात. या फुटी जश्या वाढतील तशा मांडवाच्या तारेवर आडव्या पसरून द्याव्यात. 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
15
4