AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वेलवर्गीय पिकांना आधार आणि बांधणी
गुरु ज्ञानAgrostar
वेलवर्गीय पिकांना आधार आणि बांधणी
कारले, भोपळा, दोडका, काकडी यासारख्या वेलवर्गीय पिकांचे योग्य उत्पादन घेण्यासाठी पिकांना आधार देणे अत्यंत गरजेचे आहे. मांडव किंवा ताटी पद्धतीचा वापर केल्यास वेलींची योग्य वाढ होते आणि दर्जेदार उत्पादन मिळते. 👉आधाराचे फायदे: ✅ वेली मोकळ्या वाढल्यामुळे सूर्यप्रकाश आणि हवा चांगली खेळती राहते, त्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. ✅ फळांचा मातीशी थेट संपर्क येत नाही, त्यामुळे फळांचे खराब होण्याचे प्रमाण कमी होते. ✅ वेलींची एकसारखी वाढ होते आणि उत्पादनात वाढ होते. 👉योग्य व्यवस्थापन: ✅ योग्य वेळेत मांडव किंवा ताटी बांधणी करावी. ✅ खत आणि पाण्याचे संतुलित नियोजन करावे. ✅ फुलोरा अवस्थेत 19:19:19 @50 किलो, 24:24:0 @50 किलो, भूमिका 4 किलो आणि सुक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-1 @2 किलो प्रति एकर यांचा वापर करावा. ✅ हलकी मातीची भर दिल्याने पीक अधिक निरोगी राहते आणि उत्पादन चांगले मिळते. योग्य नियोजन आणि आधार दिल्यास वेलवर्गीय पिकांचे उत्पादन जास्त आणि दर्जेदार मिळते. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0
इतर लेख