कृषि वार्ताAgroStar
वेलवर्गीय पिकांतील फळमाशीचे नियंत्रण
कलिंगड, भोपळा, दोडका, कारली यांसारख्या वेलवर्गीय पिकांमध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव झाल्यास फळे वाकडी होण्याची समस्या दिसून येते. ही समस्या वाढल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होतो आणि बाजारमूल्यही घटते. त्यामुळे वेळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे.
👉फळ माशी नियंत्रणासाठी खालील उपाय करा:
✔ कामगंध सापळे बसवा: प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकरी 5 ते 7 कामगंध सापळे लावावेत आणि दर 20 दिवसांनी ल्युर बदलावे. हे सापळे नरमाशी पतंगांचे नियंत्रण करून माशीचा प्रादुर्भाव वाढण्यापासून रोखतात.
✔ रासायनिक नियंत्रण: जर फळ माशीचा प्रादुर्भाव वाढला असेल, तर क्लोरपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% घटकयुक्त ऍरेक्स 505 कीटकनाशक @ 2 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
👉या उपाययोजना वेळेवर केल्यास फळ माशीचा प्रादुर्भाव नियंत्रित राहील आणि पिकांचे उत्पादन व गुणवत्ता सुधारेल. आपल्या वेलवर्गीय पिकांचे संरक्षण करा आणि उत्तम उत्पादन घ्या!
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.