AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
विलासराव देशमुख अभय योजना!
योजना व अनुदानAgrostar
विलासराव देशमुख अभय योजना!
➡️ महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना ही एक महत्वपूर्ण योजना असून कायमस्वरूपी विजपुरवठा खंडित असणाऱ्या महावितरणच्या ग्राहकांसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. विजेच्या थकबाकीच्या प्रश्नाचा विचार केला तर ती खूप मोठी असून साधारणपणे विजपुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांकडे 9000 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महावितरणची आर्थिक घडी देखील विस्कटली असल्यामुळे या आर्थिक अरिष्ठातून महावितरणला बाहेर काढण्यासाठी ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित आहे अशा ग्राहकांना सवलत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विलासराव देशमुख अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. ➡️ही योजना महाराष्ट्र राज्यातील सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. परंतु या योजनेतून कृषी ग्राहकांना वगळण्यात आले असून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना ही योजना लागू असणार आहे. कृषी ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. परंतु बाकीचे ग्राहक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ➡️या योजनेचा लाभ घेण्यासाठी थकबाकीदार असलेल्या ग्राहकांना त्यांच्या असलेल्या थकबाकीची रक्कम एकाच वेळेस म्हणजे एक रक्कम भरावी लागणार आहे. त्यावेळेस या ग्राहकांच्या असलेल्या थकबाकी वर जे व्याज व विलंब आकार संपूर्णपणे माफ करण्यात येणार आहे व त्यांना अतिरिक्त सवलत देखील देण्यात येणार आहे. या योजनेचे कालावधी हा सहा महिन्यांसाठी म्हणजेच एक मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 इतका होता. ➡️परंतु अनेक ग्राहकांनी या योजनेला मुदत वाढ देण्याची विनंती केल्यामुळे व थकबाकी भरण्याची तयारी दर्शवली व आता या योजनेला 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक आणि पात्र ग्राहकांनी या मुदतीपूर्वी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे. ➡️तसेच थकबाकी एकरकमी भरण्याची इच्छुक असलेल्या ग्राहकांनी उच्च दाबाच्या वीज जोडणीसाठी मूळ थकबाकीच्या 95% किंवा लघुदाबाच्या विजजोडणीसाठी मूळ थकबाकीच्या 90% व त्यासोबतच अर्ज मंजुरीच्या तीस दिवसाच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरावे लागणार आहे.समजा काही ग्राहकांना जर हप्ते वारीने पैसे भरायचे असतील तर अशा इच्छुक असलेल्या ग्राहकांना थकबाकीचा पहिला हप्ता 30 टक्के आणि त्यासोबतच अर्ज मंजुरीच्या सात दिवसांच्या आत आवश्यक कायदेशीर शुल्क भरणे गरजेचे आहे. उर्वरित रक्कम ठराविक हप्त्यात महिन्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी भरावी लागते. ➡️संदर्भ:- Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
3
इतर लेख