AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटMausam Tak Devendra Tripathi
विदर्भात पाऊस गारपिटीचा इशारा!
👉🏻पुढील दोन दिवस विदर्भ, मराठवाड्यात पाऊस व गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवेची चक्रीय स्थिती सध्या महाराष्ट्राच्या मध्य भागावर आहे. कोकण, गोव्यात पाच दिवस हवामान कोरडे राहील. मध्य महाराष्ट्रात नगर, सांगली व सोलापूर येथे आज म्हणजेच ११ व १२ एप्रिल रोजी आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विजांचा कडकडाटही होईल. विदर्भात पुढील दोन दिवसांत मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट होईल. राज्याच्या कमाल तापमानात पुढील दोन दिवस काही बदल होणार नाही. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ ३५ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदले गेले. 👉🏻संदर्भ : Mausam Tak Devendra Tripathi वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
23
1
इतर लेख