AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकातील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!🍆
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
वांगी पिकातील शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण!🍆
• शेतकरी बंधुनो, वांगी पिकामध्ये फळ आणि शेंडा पोखरणारी कीड सर्वसाधारणपणे ४० टक्के नुकसान करते. • योग्य वेळी उपाययोजना केल्या नाहीत, तर हे नुकसान ८० टक्क्यापर्यंत जावू शकते. • त्यामुळे या किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त शेंडे व फळे आढळून आल्यास काढून नष्ट करावीत. • पीक फुलोऱ्यावर येण्या अगोदर एकरी ४ ते ६ कामगंध सापळे लावावेत. • रासायनिक नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% एसजी घटक असेलेले अमेझ एक्स @८० ते १०० ग्रॅम किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल १८.५% एससी घटक असलेले कोराजन @६० मिली प्रति एकर याप्रमाणे २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
27
7
इतर लेख