AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिकांमधील शेंडे व फळ पोखरणारी अळी!
गुरु ज्ञानAgroStar
वांगी पिकांमधील शेंडे व फळ पोखरणारी अळी!
🌱शेंडे व फळ पोखरणारी अळी पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत शेंडा व फळधारणा वेळी फळांमध्ये नुकसान करते. हि अळी प्रथम पानांच्या देठात, कोवळ्या शेंड्यात आत शिरून आतील भाग खाते. त्यामुळे शेंडे वाळतात. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळी पोखरून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त फुले फळे न धरता वाळून, सुकून जमिनीवर गळून पडतात. फळे आल्यानंतर ही अळी सुरुवातीला छिद्र करून फळात प्रवेश करते. प्रादुर्भावग्रस्त झाडाची शेंडे व फळे तोडून अळ्या सहित त्यांचा नायनाट करावा. प्रकाश सापळ्यांचा उपयोग करून पतंग नष्ट करावेत. वांग्याच्या पिकामध्ये सर्वेक्षणासाठी एकरी पाच कामगंध सापळे पिकाच्या वर एक फूट उंचीवर लावावेत. नियंत्रणासाठी अग्रोस्टारचे अमेज एक्स (एमॅमेक्टिन बेंझोएट 5 % SG) १० ग्रॅम / पंप किंवा क्लोराँट्रानिलिप्रोल 18.50 % SC अग्रोस्टार चे रॅपीजेन - ६० - ८० मिली / एकर प्रमाणे वापरावे. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0