गुरु ज्ञानAgrostar
वांगी पिकांमधील फळ पोखरणारी अळी
बदलत्या हवामानामुळे वांगी पिकाच्या फुले व फळाच्या अवस्थेत शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ही अळी फिक्कट पांढऱ्या रंगाची असून शेंड्यातून खोडात शिरते आणि आतील भाग पोखरते, त्यामुळे झाडाचे शेंडे वाळून वाढ खुंटते.
👉फळांवर होणारे नुकसान:
- लहान अवस्थेत अळी देठाजवळून फळात शिरते, परिणामी फळ विक्रीयोग्य राहत नाही.
- प्रभावित झाडांची वाढ खुंटल्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.
- जास्त प्रादुर्भाव असल्यास 30-40% नुकसान होऊ शकते.
👉नियंत्रणासाठी उपाययोजना:
- एकात्मिक कीड व्यवस्थापन अवलंबणे आवश्यक आहे.
- फुलोरा अवस्थेत शेतात कामगंध सापळे लावावेत, जेणेकरून कीड नियंत्रण सहज होईल.
- प्रादुर्भाव झाल्यावर क्लोरॅन्ट्रीलीप्रोल घटक असलेले रॅपीजेन अळीनाशक @80 मिली प्रति एकर फवारावे.**
योग्य वेळी उपाययोजना केल्यास वांगी पिकाचे संरक्षण होऊन उत्पादनात घट टाळता येईल.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.