AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
वांगी पिक: फुलकिडे व कोळी नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
वांगी पिक: फुलकिडे व कोळी नियंत्रण!
👉वांगी पिकाचे बहुतांशी तोडे झाल्यानंतर फळाच्या देठावर काळपट किंवा विटकरी रंगाची बुरशी आढळते. ही समस्या मुख्यतः कोळी आणि फुलकिडींच्या जास्त प्रादुर्भावामुळे निर्माण होते. या किडी फळाच्या देठातील पेशींवर परिणाम करून बुरशी वाढीस मदत करतात, त्यामुळे फळांचे गुणवत्ता आणि टिकवणक्षमता कमी होते. 👉या समस्येच्या प्रभावी नियंत्रणासाठी कोळीनाशक आणि फुलकिडी नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे. कोळी आणि थ्रिप्स नियंत्रणासाठी फिप्रोनील घटक असणारे ऍग्रोनिल-एक्स @1.5 मिली प्रति लिटर आणि स्पायरोमेसिफेन घटक असणारे सिकंदर @1 मिली प्रति लिटर यांची फवारणी करावी. 👉पहिल्या फवारणीनंतरही समस्या कायम राहिल्यास दुसरी फवारणी करून पूर्ण नियंत्रण मिळवता येऊ शकते. याशिवाय, पिकाची नियमित देखभाल, योग्य अंतर व्यवस्थापन आणि फवारणी केल्यानंतर दोन दिवसांनी पाण्याचा हलका मारा केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी करता येतो. योग्य वेळी नियंत्रण घेतल्यास वांगी पिकाच्या उत्पादनात वाढ होईल आणि बाजारातील गुणवत्ताही सुधारेल. 👉संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
7
0
इतर लेख