AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लिंबूवर्गीय पिकावरील तेलकट चट्ट्यावर उपाययोजना!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
लिंबूवर्गीय पिकावरील तेलकट चट्ट्यावर उपाययोजना!
➡️तेलकट चट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात पानगळ होते. पानगळ झाल्यामुळे बहारावर विपरीत परिणाम होतो.परिपक्व झालेल्या पानांच्या मागील बाजूस सर्वप्रथम पिवळसर ते गडद तपकिरी ते काळ्या रंगाचे चट्टे दिसून येतात.अनियमित आकाराचे पिवळे वलय असलेले तेलकट चट्टे पानांखाली व पानांच्या वरच्या बाजूने निर्माण झाल्यामुळे लांबून ही झाडे पिवळी पडल्याचे भासते.पानांच्या देठाजवळ चट्टे निर्माण झाल्यास पाने गळून पडतात. ➡️फळांना रोगाचा संसर्ग झाल्यास फळांच्या पृष्ठभागावर काळे, लहान डाग तयार होतात. फळांवर, मृत पेशीयुक्त तेलकट चट्टे दिसून पडतात. अशी फळे काही प्रमाणात पिवळी हिरवी दिसतात. एकसारखा पिवळा रंग न आल्यामुळे अशा फळांना मागणी कमी राहते. दरही मिळत नाही ➡️रोगाचा प्रादुर्भाव व तीव्रता वाढल्याचे आढळल्यास नियंत्रणासाठी झायनेब २ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २.४ ग्रॅम/ १लिटर पाण्यात मिसळून फवारावे तसेच १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारनी करावी . परिघात पानगळ झालेल्या पाला पाचोळ्यावरही फवारणी करून त्याची विल्हेवाट लावावी. ➡️संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
14
1