गुरु ज्ञानAgrostar
लाल कोळी कीड नियंत्रणासाठी
👉सध्याच्या उष्ण व कोरड्या हवामानामुळे वांगी, मिरची, भेंडी तसेच कलिंगड पिकांमध्ये लाल कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ही कीड पानांच्या खालच्या बाजूला आढळते आणि रसशोषण करत पानांवर लहान तपकिरी ठिपके तयार करते. परिणामी, पाने पिवळी पडतात, वाळतात आणि उत्पादनात घट होते.
👉लाल कोळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी स्पायरोमेसिफेन घटक असणारे सिकंदर कीटकनाशक @1 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी करताना अधिक पाण्याचा वापर करावा, जेणेकरून लाल कोळीने तयार केलेले जाळे धुतले जाईल आणि किडीचे नियंत्रण जलद आणि प्रभावी होईल.
👉अतिरिक्त उपाययोजना:
✅ पिकामध्ये योग्य अंतर ठेवून लागवड करावी.
✅ ठिबक सिंचन वापरून ओलावा टिकवावा.
✅ नियमित निरीक्षण करून किडीचा प्रादुर्भाव वाढण्यापूर्वी नियंत्रण करावे.
👉योग्य वेळी उपाययोजना केल्यास लाल कोळीच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान टाळता येईल आणि उत्पादनात वाढ होईल.
👉संदर्भ : AgroStar
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.