AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
लक्ष द्या! 'या' 4 बँकांनी बदलले आहेत महत्त्वाचे नियम!
समाचार न्यूज १८ लोकमत
लक्ष द्या! 'या' 4 बँकांनी बदलले आहेत महत्त्वाचे नियम!
➡️तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांचे ग्राहक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या बँकांनी आपले काही नियम बदलले आहेत. बँकांनी खातेदारांना या नियमांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितलं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचे नवे नियम ➡️तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल, तर आता तुम्हाला पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. SBI च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने १ फेब्रुवारी २०२२ पासून आयएमपीएस व्यवहारांमध्ये एक स्लॅब जोडला आहे. हा स्लॅब २ ते ५ लाख रुपयांपर्यंत आहे. आता २ ते ५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम शाखेतून IMPS द्वारे पाठवल्यानंतर त्यावर २० रुपये शुल्क आणि GST आकारला जाईल. ICICI Bank च्या नियमांतदेखील बदल ➡️ ICICI बँकेने केलेले बदल १० फेब्रुवारीपासून लागू होतील. चेक किंवा ऑटो डेबिट रिटर्न असेल तर ग्राहकांना संपूर्ण रकमेवर २ टक्के शुल्क भरावं लागेल. तसंच ग्राहकाच्या बचत खात्यातून ५० रुपये आणि जीएसटीही कापला जाईल. हे शुल्क किमान ५०० रुपयांच्या व्यवहारांवर लागू होईल. बँक ऑफ बडोदा ➡️बँक ऑफ बडोदामध्ये खातं असलेल्या ग्राहकांसाठी बँकेने चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलले आहेत. बँकेने ग्राहकांना सूचित केलं आहे, की चेक पेमेंटसाठी ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टीम फॉलो करावी लागणार आहे. आता ग्राहकांना चेक दिल्यानंतर त्या चौकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागणार आहे. तसं न केल्यास चेक परत केला जाऊ शकतो. हे नियम १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकवर लागू होतील. पंजाब नॅशनल बँक पंजाब नॅशनल बँकेनेही आपल्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. तुमच्या खात्यात पैसे नसतील आणि त्यामुळे तुमचा हप्ता किंवा गुंतवणूक डेबिट अयशस्वी झालं, तर तुम्हाला २५० रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत दंडाची रक्कम १०० रुपये होती. याशिवाय डिमांड ड्राफ्ट रद्द केल्यास आता १०० ऐवजी १५० रुपये भरावे लागतील. संदर्भ:-न्यूज १८ लोकमत, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
19
4
इतर लेख