AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानतुषार भट
रासायनिक खते वापरताना घ्या काळजी!
🌱पिकास सर्व नत्रयुक्त खतांची मात्रा एकाच वेळी न देता पीक वाढीच्या अवस्थेत विभागून द्यावी. जेणेकरून नत्रयुक्त खतांचा ऱ्हास होणार नाही. पेरणीच्या वेळी खते आणि बियाणे एकाच वेळी पेरणी यंत्राच्या साहाय्याने दिल्यास खते झाडाच्या मुळांच्या खालच्या थरात उपलब्ध होऊन पिकास अधिक फायदा होतो. रोपावस्थेत खते वापरताना खते रोपभोवती रिंगण पद्धतीने टाकावीत परंतु खतांचा रोपांशी प्रत्यक्ष संपर्क येऊ देऊ नये अन्यथा रोपे खराब होण्याची शक्यता असते. ओलसर खते वापरताना खते कोरड्या मातीत मिसळून द्यावीत. 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
2